योगासने: योगासन करताना घ्यायची काळजी ,नियम अन त्यांचे महत्व मराठी।

A Sound mind in a sound body

शरीराच्या आंतरबाह्य भागांना निरोगी ठेवण्याच्या क्रिया म्हणजे योगासने। जोपर्यंत शरीराचे भाग निरोगी नसतात तोपर्यंत कोणतेही काम चांगल्या प्रकारे करता येत नाही। कारण शरीर व मनाचा एक दुसऱ्याशी घनिष्ठ संबंध आहे । यांपैकी एकाची उपेक्षा केली तर दुसरे सुदृढ राहूच शकत नाही।

म्हणून च हजारो वर्षांपूर्वी ग्रीक लोकांनी ‘ निरोगी शरीरात निरोगी मनाचा वास’ असा सिद्धांत मांडला होता आणि सिद्धांतावरच त्यांच्या शिक्षणाची समग्र पद्धती आधारलेली होती।

शरीरामध्ये रोजच्या विविध हालचालीमुळे व रोजच्या भोजनामुळे शरीरमध्ये जे मलमूत्र व विकृती निर्माण होतात त्या पुढील प्रमाणे सात मार्गांनी शरीरातून बाहेर पडतात ।

1👍 डाव्या उजव्या नाकपुढयांद्वारे,

2👍 डाव्या उजव्या नेत्रांद्वारे ,

3 👍 डाव्या उजव्या कांनाद्वारे,

4👍 मुखाद्वारे,

5👍 गुदद्वारे

6👍 जननेंद्रिया द्वारे

7👍 चामडी द्वारे ।

मूल मुत्र वैगेरे विकृती जर या सात मार्गानी पुरेश्या प्रमाणात बाहेर पडल्या नाहीत तर अनेक प्रकारचे रोग होतात ।

योगसन पद्धतीमुळे मुलमूत्र वैगेरे विकृती वरील सात मार्गानी पुरेशा प्रमाणात व नियमित पणे शरीरातून बाहेर पडतात आणि त्यामुळे शरीर सम्पूर्ण निरोगी राहते।

👌योगसन पद्धति अधिक महत्वपूर्ण आहे त्याची कारणे खलील प्रमाणे आहेत।

*महत्व:

(1) व्यायामाच्या इतर पद्धतीमुळे शरीराच्या आंतरिक भागांना योग्य प्रमाणात व्यायाम मिळत नाही;परंतु योगासन पद्धतीत शरीराच्या आंतरिक भागांना देखील पुरेशा प्रमाणात व्यायाम मिळतो। परिणामी योगासन पद्धतीमुळे व्यक्ती दीर्घकाळापर्यंत स्वस्थ व निरोगी जीवन जगू शकतो।

(2) योगसने करण्यासाठी अत्यंत मर्यादित जागेची आणि कमी साधनांची जरुरी असते।

(3) इतर खेळात जोडीदार खेळाडूंची अनेकदा गरज भासते, परंतु यागासनपद्धतीत व्यक्ती स्वतः एकट्याने आसने करू शकतो।

(4) व्यायामाच्या इतर पद्धतींमुळे योगासनांचा परिणाम मनुष्याच्या मनावर व इतर इंद्रियांवर अधिक होत असतो; त्यामुळे मन आणि इंद्रिये याना काबूत ठेवू शकणाऱ्या मनुष्याच्या तण मनाच्या आंतरिक शक्तीचा विकास होतो।

(5) योगासन मध्ये अधिक आहाराची गरज भासत नाही; त्यामुळे विशेष खर्च ही होत नाही।

(6) योगासने माणसाला चारित्र्याशील बनवतात।

(7) योगासन मुळे मानसिक शांती प्राप्त होते आणि त्यामुळे बुद्धीचा विकास होतो

(8) वेगवेगळ्या आसनाद्वारे शरीरातील केशवाहिन्या मधील रक्त त्वरेने शुद्ध करता येते।

(9) योगासन आणि प्राणयामामुळे रुधिराभिसरणाची शक्ती वाढते व त्यामुळे रक्त मोठ्या प्रमाणात शुद्ध होते।

(10)योगासन मुळे आणि प्राणायाम मुळे बुद्धकोष्ठ ता, वायूविकार, मधुमेह, रक्तदाब , हर्निया व डोकेदुखी वैगेरे रोग बरे करता येतात।

(11) वयस्कर स्त्री पुरुष देखील योगासन करू शकता।

सूचना:

योगासनांपासून पुरेपूर लाभ मिळवण्यासाठी खलील सूचनांचे पालन करणे हितावह आहे:

(1) योगासने करण्याची जागा सपाट ,स्वच्छ आणि शांत असायला हवी। अशी जागा सतरंजी टाकून तीवर योगासने करावीत ।

(2) योगासने करताना ऋतुमानानुसार पोशाख करावा।पुरुषांसाठी लंगोट, जागींया स्त्रीयांसाठी पंजाबी ड्रेस किव्वा slaks हा अधिक अनुकूल असा पोषाख आहे।

(3) योगासने प्रातःकाळी शौखमार्जनांनंतर करावीत।

(4) योगासन नन्तर गरम पाण्याने अंघोळ करावी।

(5) योगासन करताना बोलू नये।

(6) योगसन करताना हिसके देऊन किंवा जोर लावून आसन करू नये।

(7)आसने करणार्याने शक्यतो हलका आहार घ्यावा।त्यामुळे शरारही हलके राहील।

(8) योगासने केल्ल्यांनातर थोडा वेळ शवासन कररावे।शवासन हे सम्पूर्ण आसन आहे।त्यामुळे शरीरातील थकवा नाहीस होतो।

(9) आसने केल्ल्यांनातर जर थकवा वाटला नाही ,शरीर हलके वाटले आणि जर काम करण्याचा जोम वाढला तर निश्चितच समजावे की योगासने चांगल्या प्रकारे करण्यात येत आहेत।

या ब्लॉग वर आपल्याला योगासन चे खूप सारे प्रकार त्यांची माहिती फायदे कृती इत्यादी ची उत्तम प्रकारे माहिती भेटेल।

आपणास ही माहिती महत्वाची वाटल्यास कृपया share करा। आणि सपोर्ट करा।

धन्यवाद।।।

Leave a comment